चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)योगेश्वर शेंडे
दि.०६.०७.१९
चिमूर- चार दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावे अन्यथा तीव्र अनोदलन करण्याचा इशारा जि. प.गट नेता डॉ.सतिश वारजूकर यांनी दिला आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यातील गिरगांव, झाडबोरी,सावरगाव, आकापूर ,उश्राळमेंढा, गंगासागर,हेटी,जनकापूर गावे पाच दिवसापासून अंधारात असून महावितरण कंपनीचे यावर दुर्लक्ष करीत आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे,कारण शेतकऱ्यांची विद्युत पंप चालत नाही ५-५ मिनटांनी विद्युत पुरवठा बंद होत असल्याने शेतकरी आपल्या शेतीला योग्य वेळी पाणी पुरवठा करू शकत नाही,गावांमध्ये बसविलेले ट्रान्सफॉर्मर यांची देखभाल व दुरुस्ती होत नाही.कोठे विजेचा तारा लोंबखळत आहेत तर कुठे विजेचे खांब झुकलेली आहेत त्यामुळे ५-५ मिनिटांनी वीज पुरवठा बंद होतो व याचा त्रास गावातील जनतेला होत असल्याने गावकरी कनिष्ठ अभियंता कार्यालय सावरगाव येथे जाऊन धडकले व लवकरात लवकर नवीन ट्रान्सफॉर्मर ,लोंबकळत असलेल्या तारा ,झुकलेले खांब यांची योग्य देखभाल व दुरुस्ती करून सततचा विद्युत पुरवठा खंडित होणे थाबवावे अशी मागणी जि. प.चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान गट नेता डॉ.सतिश वारजूकर व गावकऱ्यांनी केली,चार दिवसात गावकऱ्यांची समस्या निकाली न लागल्यास चार दिवसानी तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा जि. प.गट नेता डॉ.सतिश वारजूकर व गावकऱ्यांनी केला त्यावेळी नागभीड तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष प्रफुलभाऊ खापर्डे, जि. प.सदस्य खोजरामजी मरसकोल्हे,जि. प.सदस्य नयनाताई गेडाम,तालुका कांग्रेस कमिटी सचिव विनोदभाऊ बोरकर,सरपंच संघनेचे अध्यक्ष हेमंत लांजेवार,प्रभाकरजी बोरकर,ग्रा.पं. सरपंच कल्पनाताई पेंदाम सावरगाव, बंडूभाऊ खोब्रागडे,प्रशांत गायकवाड,शरदजी सोनवाने,दिपजी गायकवाड,विलास भाकरे,भारत चुनारकर,राकेश खोब्रागडे,नभी शेख,सुखदेवजी डोंगरावर,व संपूर्ण कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.



















