सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.०४.२०२०
खटाव- संपूर्ण देशभर लॉकडाऊन सुरु असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. लॉकडाऊन मध्ये बेघर,निराधार, स्थलांतरित मजूर आणि गोरगरीब कुटुंबाचे अन्नावाचून होणारे हाल दूर करण्यासाठी मायणी येथील विनायक दुर्गामाता मंडळाने पुढाकार घेत चितळी रोडला पोलीस दूरक्षेत्राजवळ अन्नदान सुरु केले आहे. याठिकाणी सकाळी ९ ते ११ या वेळेत सुमारे २०० नागरिकांना सोशल डीस्टन्स चे पालन करून मोफत जेवण पार्सल स्वरुपात उपलब्ध करण्यात येत आहे.
व्यवहार व वाहतूक बंद असलेने गोरगरीब जनतेचे होत असलेले हाल तसेच बेघर, निराधार, स्थलांतरित मजूर, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती व उघड्यावर राहणाऱ्या नागरिकांसमोर जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.या काळात अशा नागरिकांना किमान एकवेळचे का होईना पोटभर अन्न मिळावे यासाठी मंडळाने मोफत अन्नदान सुरु करण्याचा निर्णय घेत दि.१८ एप्रिल पासून मोफत जेवण वाटपास सुरुवात केली.



















