सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०५.०६.२०२०
माळशिरस- देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने महाराष्ट्र राज्यातही कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे ग्रामीण भागात ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला व मजुरांना मोलमजुरी करून उपजीविका भागविणे कठीण जात आहे त्यातच हाथाला काम नसल्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने २० लाख कोटिचे पॅकेज जाहिर केले पण त्यामध्ये महिला स्वयं सहाय्य ते साठी कोणतीही तरतुद केली नाही. महिलांना मायक्रो फायनान्स व बॅक कर्ज प्रकरणे याच्यामध्ये कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे महिला वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. महिला बचत गटाच्या महिला कडून बचत गटाचे कर्ज माफ व्हावी मागणी होत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारला त्यांनी बचत गटामार्फत जे कर्ज घेतले आहे. ते कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये काम न मिळाल्यामुळे जी काही बचत शिल्लक होती तीही खर्च झालेली आहे. त्यामुळे बचत गटाचे हफ्ते भरणे खुप कठिण झाले आहे. दोन वेळेची पोटाची खळगी भरणे सध्या अवघड आहे. आणि त्यातच मायक्रो फायनान्स व बॅकांनी हप्ता भरण्याचा तगादा लावलाने आहे. बचत गटाचे राहिलेलले सर्व बॅक व मायक्रो फायनान्सचे सर्व हफ्ते माफ व्हावे, महिलांना सन्मानाने जगण्याची संधी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांनी द्यावी घरात बसून लॉकडाउनच्या काळात चार रुपये कमावण्याचे साधन म्हणून सर्व महिलांना नरेगा रोजगार हमी योजने अंतर्गत काम देण्यात यावे, व महिलांच्या जनधन खात्यावर ते कमीत कमी पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.



















