सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.११.२०२०
■ या घटनेत कोणीही गंभीर झालेले नाही. छऱ्याच्या बंदुकीतून हा गोळीबार झाला आहे.
●श्री. नारायण शिरगावकर
उपविभागीय पोलिस अधिकारी
फलटण- तालुक्यात गुन्हेगारी वाढत असून पोलीसाचा पाहीजे तेवढा दबाव गुन्हेगारीवर राहिला नसून गुन्हेगाराचा प्रभाव असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. गुन्हेगाराची येवढी मजल वाढली आहे की गुन्हाचा तपास करनाऱ्या सहायक पोलीस निरिक्षकावरच छऱ्याच्या बंदुकीतून हा गोळीबार केला आहे. या गोळीबारात सहायक पोलीस निरिक्षक सोमनाथ लांडे थोडक्यात वाचले आहेत. लांडे आपल्या सहकाऱ्यांसह जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधासाठी फलटण तालुक्यातील वडले येथे गेले असताना हा प्रकार घडला आहे. वडले गाव हे फलटण-शिंगणापूर रस्त्यावर फलटणपासून नऊ किमी अंतरावर आहे. २६ ऑक्टोबर रोजी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पळशी ते मोरगाव रस्त्यावर सराफ व्यावसायिकाची दुचाकी अडवत डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडील ११ लाख ६६ हजारांचे दागिने अज्ञातानी जबरीने चोरुन नेले होते. याबाबत अमर रंगनाथ कुलथे (रा. मोरगाव) या सराफ व्यावसायिकाने यासंबंधी फिर्याद दिली होती. २५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहुर्तावर पळशीत सोने- चांदी विक्रीचे दुकान टाकणाऱ्या कुलथे याना उदघाटनाच्या दुसऱ्याच दिवशी लुटण्यात आले होते. या घटनेचा वडगाव पोलिसांकडून गेल्या महिनाभरापासून तपास सुरु आहे. दरम्यान लांडे हे सहकाऱ्यांसह रविवारी तपासाला फलटण तालुक्यात गेले होते. या प्रकरणातील संशयित माने नावाचा व्यक्ती वडले गावात असल्याची माहिती त्याना मिळाली होती वडले येथे गेल्यावर त्यांच्यावर संशयिताने गोळीबार केला आहे.



















