तेल्हारा येथे महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती उत्साहात साजरी; विविध क्षेत्रातील कलावंत, साहित्यिक व विचारवंतांची उपस्थिती…
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.३०.०८.२०२६
तेल्हारा- समता कला सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था तथा महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सव समिती, तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, तेल्हारा येथे महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला तळागाळातील कलावंत, साहित्यिक, विचारवंत, वारकरी संप्रदायातील मंडळी तसेच उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष भाऊ रौंदळे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन शाहीर मुरलीधरजी लोणाग्रे महाराज, जिल्हा सदस्य, राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ कलावंत मानधन योजना, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रख्यात गायक सारंगदादा पुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रविंद्र विरघट, अध्यक्ष, समता कला सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, गाडेगाव; डी. जे. वानखडे, संपादक, समता नायक; शाहीर विजय पांडे, सप्तखंजिरी वादक; शाहीर गणेश इंगळे, अकोला; महाराष्ट्र पुरस्कारप्राप्त कवी देवराव तेलगोटे, आकोट यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला भारती आठवले, अशोक भाऊ दारोकार, केशवराव ताथोड, रविंद्र दामोदर, भीमराव तायडे, संतोष दामोदर, सुरेश राहणे, गोपाल झुने, संजय मासाळ, संघर्ष बोदळे, देविदास तायडे, तेजराव गवई, उत्तम गवई, राहुल तायडे, गजानन तायडे, बाळू पोहरकार, स्वराज दामोदर, सुमेध गवळी, संतोष पवार, विठ्ठल राठोड, सुमेध गवई, रवि दामोदर, धम्मपाल दामोदर, लक्ष्मण दांडगे, स्वप्निल गवई, गौरव गवई, विजय निखाळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सदानंद मोरे, राहुल गवई, संघपाल दामोदर, रवीभाऊ दामोदर यांच्यासह समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर पोहेकर यांनी केले.
यावेळी विविध कलावंतांनी आपल्या कला सादरीकरणातून महाकवी वामनदादा कर्डक यांच्या विचारांना व साहित्यिक वारशाला अभिवादन केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



















