रत्नागिरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.१२.२०२०
खेड- पिरलोटे येथील मराठी शाळेनजीकच्या जंगलमय भागात प्रफुल्ल भगवान कदम (वय ३२, रा.गणेशनगर वावे, ता.खेड) या तरुणाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. प्रफुल्ल हा दि १५ रोजी घरातून निघून गेला होता. खेड पोलीस ठाण्यात याबाबत लापता नोंद करण्यात आली होती, मात्र त्याचा मृतदेह मौजे पिरलोटे गावठाण मराठी शाळा नजीकच्या जंगलमय परिसरात १६ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी प्रफुल्लचे वडील भगवान पांडुरंग कदम (वय ५५) यांनी खेड पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोद केली असून अधिक तपास पोलीस कर्मचारी पवार करत आहेत.



















