छ.संभाजी महाराजांना शिवसंग्रामतर्फे आ.मेटे यांच्या उपस्थितीत अभिवादन
पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१६.०५.२०२१
पुणे- एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन राज्य करणारे, रयतेला न्याय देणारे, मायभूमीचे रक्षण करणारे, बुद्धिमान कुशल प्रशासक, महापराक्रमी राज्यकर्ते, असामान्य शौर्याचे प्रतीक असलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६४ व्या जयंती निमित्त शिवसंग्राम संघटना पुणे शहरच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
या वेळी शिवसंग्राम संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी पुष्पहार अर्पण करून आभिवादन केले. यावेळी
शहर अध्यक्ष श्री.भरत लगड, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.कल्याण अडागळे, संपर्क प्रमुख श्री.तुषार काकडे, युवक शहर अध्यक्ष श्री. नितिन ननवरे, सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष श्री.विनोद शिंदे, पुणे शहर सरचिटणीस श्री.सचिन दरेकर, पुणे शहर उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब चव्हाण, युवा नेते श्री. चेतन भालेकर, पुणे शहर सचिव श्री.अभिजीत म्हसवडे सोशल मीडिया शहर प्रमुख श्री.लहू ओहोळ, श्री.अजिंक्य राजपुरे उपस्थित होते.



















