मुंबई (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८.०८.२०२२
🔹 महाराष्ट्र सचिव महेंद्र कणसे यांचा पक्ष सोडण्याचा विचार ?
नवीमुंबई- एकीकडे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल बाबासाहेब आंबेडकरांचा आणि भगतसिंग यांचा फोटो लावून पक्ष पुरोगामी विचारांचा असून घटनेला मानणारा आहे असे ठामपणे सांगत आहेत आणि दुसरीकडे नवी मुंबईतील कार्यकारणी बीसी सेलचे महाराष्ट्र सचिव महेंद्र कणसे यांनी राजस्थान जालोर येथील प्राध्यापकाने पाण्याच्या वादातून ९वर्षीय लहान बालकाचा मारून जीव घेतल्याच्या दुर्दैवी घटनेबद्दल स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव समारंभाला श्रद्धांजली देऊन निषेध व्यक्त करण्याकरिता सुचविले असता “व्हॉट नॉन्सेन्स, नको ते जातीवादी विषय आपण का मांडत आहात?” असे म्हणत प्रीती शिंदेकर यांनी त्यांना व्हाट्सअप ग्रुप वरून काढून टाकले असून पक्षातून हकालपट्टी करण्याची धमकी देण्यात आली. यावर महेंद्र कणसे यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून आपण मला पक्षातून काढू शकत नाही असे स्पष्ट केले. परंतु पक्षातील श्यामभाऊ कदम, प्रीती शिंदेकर सारख्या नवी मुंबई कार्यकारणीतील नेत्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल व राजस्थान जालोर येथील दुर्दैवी घटने बद्दल गांभीर्य नसून साधा निषेधही व्यक्त केला नाही यावरून मागासवर्गीयांसाठी पक्षाचे ध्येय धोरण फक्त मतांचे राजकारण करून सत्ता हस्तगत करण्यासाठी असल्याचे दिसून येत आहे. याबद्दल मागील ४० वर्षापासून कामगार नेते असलेले महेंद्र कणसे यांनी खेद व्यक्त केला आहे. याशिवाय रिपाई (पुनर्बांधणी) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांना ही बाब लक्षात येतात आम आदमी पक्षातील जातीवादी नेत्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. व आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटना व पक्ष कार्यकर्त्यांना या घटनेचा जाब विचारून कायदेशीर कारवाई करावी आणि अशा जातीवादी प्रवृत्तींना ठेचण्याचे आवाहन केले आहे.



















