रायगड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, अमित साहू
दि.१५.०९.२०२२
उरण- तालुक्यातील भेंडखळ गावातील रहिवासी कॅा.राजेश ठाकूर यांच्या दुर्दैवी अपघातानंतर बीपीसीएल आणि वाहतूक विभाग जागे होऊन काही दिवसांसाठी बेकायदेशीर पार्कींग हटवण्याचा दिखावा करण्यात आला होता. परंतु काही दिवसांनंतर पुन्हा बीपीसीएल प्रशासन आणि वाहतूक पोलीसांच्या आशिर्वादाने पुन्हा बेकायदेशीर पार्कींग सुरू झाली.
आज सकाळी बीपीसीएल जवळ पुन्हा बस आणि सिलेंडर ट्रकचा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. वाहतूक पोलिसांना वरिष्ठांनी खडसावल्या नंतर बेकायदेशीर पार्कींग हटवण्याचे काम चालू झाले. रात्रीच्या वेळी पुर्ण रस्ता या अनाधिकृत पार्किंगने व्यापलेला असतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांना, प्रवाशांना व सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलीस फक्त दुचाकी स्वरांची अडवून करण्यात मग्न आहेत असा स्थानिकांचा आरोप आहे.



















