रायगड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, संदीप पतंगे
दि.१८.०९.२०२२
शहापूर- शहापूर किन्हवली रोडवर उंभ्रई येथे चारचाकी इको व दुचाकी यांच्यामध्ये मोठा अपघात झाले. यात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाले. उंभ्रई येथे मागील सहा महिन्यांपासून बरेच अपघात झाले असून बहुतेकांचे जागीच मृत्यू झाले आहे. ही खूप मोठी शोंकांतिका आहे.
चारचाकी (इको) वाहन क्र. एम एच ०४ के एल ७७०१ यावरील चालकाने आपले वाहन भरधाव वेगात चालवून समोरून येणारी मोटारसायकल क्र. एम एच ०४ के टी २९९७ हिला जोरात धडक दिली. त्यामुळे त्यावरील चालक हर्षल नरेश घोडविंदे रा.अल्यानी, शहापूर यास डोक्यास व हातास जबर मार लागल्याने अपघातात त्याचे जागीच मृत्यु झाले.मृत नरेश घोडविंदे हे डोळखांब येथे मलेरिया डॉक्टर म्हणून कार्यरत होते.
किन्हवली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी दाखल होत चारचाकी वाहन मालक याला ताब्यात घेत त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. भा.द.वि. कलम ३०४अ, २७९, ३३७, ३३८ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे व पुढील तपास चालू आहे, अशी माहिती किन्हवली पोलीस ए.पी.आय. कमलेश बच्छाव यांनी दिली.



















