मुंबई(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, मिंलीद राऊत
दि.०९.१०.२०२२
नवी मुंबई – घणसोली गावातील चिंचआली मध्ये दोन दिवसापासून पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित येत होते. खळबळजनक म्हणजे या पिण्याच्या पाण्यामध्ये गटारातील शौचाचे पाणी आढळून आले होते, अशी तक्रार बऱ्याच नागरींकाकडून अखिल भारतीय सेना युवा अध्यक्ष मयुर मोहन मढवी यांना कळविण्यात आली होती तसेच, नागरींकानी सदर्व दूषित पाणी बाटलीमध्ये भरून ते प्रत्यक्षदर्शी ठेवले होते. या दूषित पाण्यामुळे काही नागरिकांना विषबाधा होऊन जुलाब, उलटी व ताप याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावे लागले.
काही मोठी दुर्घटना होण्यापूर्वी तात्काळ मयूर मढवी यांनी महानगरपालिकेच्या सबंधित कर्मचाऱ्यांना संपर्क करून सदर्व बाब त्यांच्या निदर्शनास आणून देऊन तेथे प्रत्यक्ष हजर राहून सदर्व काम दुरुस्त करून घेतले.तसेच पालिका कर्मचाऱ्यांनी देखील हे काम त्वरित पूर्ण करून आपली जबाबदारी चोख बजावली.
नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यात स्वच्छ शहर म्हणून प्रथम मानांकन मिळाले असले तरी शहरातील काही ठिकाणी स्वच्छतेबाबत नागरींकाना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. घणसोली गावातील गटारे, पाण्याच्या लाईन वेळोवेळी योग्यरीत्या साफ व तपासल्या जात नाही असा स्थानिंकाचा आरोप आहे.



















