मुंबई(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, मिलिंद राऊत दि.१०.१०.२०२२
नवीमुंबई- बुद्ध विहार सेवा समिती कोपरखैरणेगाव, सेक्टर १९ येथे अश्विन पौर्णिमा रविवार दि.९ ऑक्टोबर रोजी बौद्ध धम्मात पवित्र स्थान असलेल्या “भिक्खू वर्षावास सांगता समारंभ” मंगलमय वातावरणात संपन्न झाले.
सकाळी ९.०० वा. बुध्द वंदना, परित्राण पाठ घेऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर महापुरुषांना वंदन करून मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. दुपारी उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आले. सायंकाळी ७.३० वा आनापान व ८ वा. प्रा. संजय म्हस्के यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी बुद्ध विहार सेवा समितीचे अध्यक्ष संजय रामचंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष रामदास वाघमारे,
कार्याध्यक्ष दिगंबर सुर्यवंशी, मुकुंद सोनकांबळे, हरिश्चंद्र सोनावणे, दत्तात्रय हराळ, दत्तू कांबळे, संगीता गायकवाड संगीता सोनावणे, विमल सोनकांबळे, नाना अनभोरे
राहुल सरदार, तातेराव कांबळे आदींसह सर्व कार्यकत्यांनी सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.



















