ठाणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.१९.१०.२०२२
🔹मृत सागर जाधव चा सरपंच उमेदवार प्रकाश वीर विजयी..
कसारा- कसारा ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांकडून पैसे घेऊन विरोधात प्रचार करीत असल्याच्या नाहक बदनामी मुळे मानसीक तणावाखाली आल्याने समतानगर मधील आर पी आयचा कट्टर कार्यकर्ता व भीमसैनिक सागर काशिनाथ जाधव याने दि. १६ ऑक्ट २०२२ रोजी रात्री रेल्वे रुळाखाली आत्महत्या करुन आपले जीवन संपविले.
या दुर्दैवी घटनेनंतर कसारा शहरात जबरदस्त तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कसारा पोलिसांनी चार जणावर गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
समतानगर मधील आरपीआयचा भीमसैनिक सागर काशिनाथ जाधव (वय३५ ) हा बैंक औफ महाराष्ट्र कसारा शाखेत नोकरी ला होता.वडील रेल्वे कर्मचारी आहेत. वर्षा पत्नी व दोन छोटे मुले सागरला आहेत.
काल कसारा ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदान वेळी वार्ड क्रमांक ५ मध्ये आरपीआयचे सौ.लिलाबाई जगन्नाथ उबाळे व सरपंच उमेदवार प्रकाश वीर यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना सागर काशिनाथ जाधव व संजय देवराम चाबुकस्वार हे पैसे घेऊन बैट चिन्हांचे (सेना)या पक्षाचे उमेदवारासाठी प्रचार करीत असल्याच्या अफवा पसरवून यशवंत भिमाजी बागुल यांचें भाचे किरण बबन जाधव , गणेश भगवान भडांगे, आकाश बबन जाधव, व सागर सखाराम उबाळे सर्व राहणार समतानगर, यांनी बदनामी करत होते. या बदनामी मुळे मानसीक तणावाखाली आल्याने दुपारी घरी जेवताना सागर जाधवने आपल्या पत्नीला हा प्रकार सांगितला.
मतदान आटोपल्यानंतर सागरने “जनशक्ती “या व्हाट्सअप ग्रुप वर अतिशय भावूक मेसेज लिहिला.. मेसेज मध्ये तो स्वाभिमानी असून संजय चाबुकस्वार व त्याने पक्षाशी व समाजाशी गददारी केली नसल्याचे स्पष्ट केले. “बदनामी करणा-यांना माफ करु नका, शेवटचा जयभीम..व पत्नी वर्षा ला मुलांची व कुटुंबांची काळजी घ्यावी” असे ह्रदयद्रावक ,भावूक मेसेज सायंकाळी सात वाजता व्हायरल केला.
सागरच्या सोशल मिडिया वरील “सुसाईड नोट” नंतर एकच खळबळ उडाली. ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रपरिवार सागरला शोधायला बाहेर पडले. साधारण ९ वाजेपर्यंत सागर व्हाट्सअप वर online होता. रात्री ११ वाजता सागरचे शव जव्हार फाटा रेल्वे ट्रॅक वर आढळला.
शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तथापि, संतप्त नातेवाईकांनी संबंधितावर गुन्हा नोंद करण्यात यावा व तातडीने अटकेची कारवाई होईपर्यंत सागरचे शवावर अंत्यसंस्कार न करता कसारा पोलिस ठाण्यात आणून ठेवू असा पवित्रा घेतलामुळे तणाव निर्माण झाला. मात्र शहापूर पोलिस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे व कसारा पोलिस सहा पोलिस निरीक्षक संदिप गित्ते यांनी कायदेशीर कारवाई चे आश्वासन दिले मुळे तणाव निवळला.
आज संध्याकाळी आरपीआयचे सरपंच उमेदवार प्रकाश वीर विजयी झालेचे घोषित झाले. सागरच्या आत्महत्या घटनेमुळे कसारा शहरात विजयाचा आनंद वा जल्लोष साजरा केला गेला नाही.
केवळ राजकीय बळी ठरलेल्या सागर काशिनाथ जाधवच्या आत्महत्या दुर्दैवी निर्णय घटनेमुळे संपूर्ण कसारा शहरात शोकाकुल व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.



















