ठाणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.१९.१०.२०२२
शहापूर- शहापूर तालुक्यातील किन्हवली विभागात वंचित बहुजन आघाडीचे विभागीय अध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वात काही वर्षांपासून मोठ्या जोमाने काम चालू आहे. याचीची आणखीन एक प्रचिती म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित ने आपले खाते खोलले आहे. यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन आशा निर्माण होऊन मोठा उत्साह निर्माण झाला आहे. वंचितसाठी किन्हवली विभागात ही एक चांगली सुरवात आहे.
खरीवली ग्रामपंचायतमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सौ. राजश्री राजाराम सोनवणे यांचे भरघोस मतांनी विजय झाले आहे. २३२ पैकी १४८ मते मिळवत त्यांचा दणदणीत विजय झाले आहे.
वंचितचे विभागीय सचिव सुधीर उबाळे, शाखाध्यक्ष पंडीत उबाळे पदाधिकारी व ग्रामस्थ महेंद्र उबाळे, प्रकाश उबाळे, प्रवीण उबाळे, जगदीश हरड व सुरेश हरड यांनी निवडणुकीत विशेष मेहनत घेतली.



















