ठाणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२०.१०.२०२२
मुंबई- मुंबईतील एम- पूर्व महानगरपालिका प्रभाग.१४७ मध्ये सेंट सेबॅस्टियन हायस्कूल चेंबूर(इंग्रजी माध्यम)असून काही पालकांनी शालेय फी थकीत असल्या कारणाने संचालक मंडळाने इयत्ता १० वी. मधील विद्यार्थांना परीक्षेस बसु दिले नाही. या विषयी तक्रार पालकांकडून स्थानिक मनसे शाखेतील पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आली होती.
सदर बाबतीत शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात जाब विचारण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी दि. १९ ऑक्ट् २०२२ रोजी सेंट सेबॅस्टियन हायस्कूल चेंबूर(इंग्रजी माध्यम)संचालक मंडळाची भेट घेतली. यावर “आम्हीं पालकांशी सुसंवाद साधून योग्य तो तोडगा काढू” असे संचालक मंडळाने आश्वासन दिले आहे.
सेंट सेबॅस्टियन हायस्कूल चेंबूर(इंग्रजी माध्यम)संचालक मंडळाच्या बैठकीस श्री. मुनावर पवार(उपाध्यक्ष मनविसे),श्री.गजेंद्र कांबळे(विभाग अध्यक्ष मनविसे),श्री.संतोष पवार (शाखा अध्यक्ष-(१४८),श्री.राजेश पुरभे,(१४६),सौ. अमिता गोरेगावकर (म. विभाग अध्यक्षा), श्री.विशाल शिंदे.(उपशाखा अध्यक्ष),कु.वैभव निकम (उपशाखा अध्यक्ष) ,सौ. सोनम गौडर(शाखा अध्यक्षा-१४८), सौ. लक्ष्मी सोलंकी (म. शाखा अध्यक्षा -१४७) व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपविभाग अध्यक्ष योगेश घनदाट यांनी दिली.



















