रायगड(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, अमित साहू
दि.६.०१.२०२३
रायगड- भाई जगताप मित्र मंडळ, रायगड, मधूशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, अलिबाग आणि ऍड. उमेश ठाकूर मित्रमंडळ यांच्यामार्फत अलिबाग येथे आयोजित “कुलाबा जीवन गौरव” राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शैक्षणिक विभागांतर्गत डॉ. झेलम चंद्रकांत झेंडे यांना प्रदान करण्यात आला.
डॉ. झेलम चंद्रकांत झेंडे यांच्या बद्दल संक्षिप्त सांगायचे झाले तर त्या रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर ए. एस. सी. महाविद्यालय, फुंडे येथे गेले १२ वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागात १० वर्ष कार्य करत असताना विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, व्यक्तिमत्त्व विकास तसेच विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले. विविध साहित्यिक पत्रिकांमध्ये त्यांचे २२ संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात २ शालेय पुस्तकात त्यांचे लिखाण ही प्रसिद्ध झाले आहे तसेच डॉ. झेलम चंद्रकांत झेंडे यांना शिलादेवी बहुउद्देशीय संस्थेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार ही प्राप्त झालेला आहे.



















