आयडीटीआर’ (IDTR) येथील महिला वाहन चालक प्रशिक्षण शिबिराला माजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय सासाने यांची भेट
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, स्वप्निल इंगळे
दि.१९-०६२०२६
पुणे- महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च’ (IDTR), पुणे येथे ‘प्रोजेक्ट परवाज’ (Project Parwaaz) अंतर्गत विशेष वाहन चालक प्रशिक्षण सुरू आहे. ब्रिजस्टोन इंडिया आणि आयडीटीआर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रशिक्षण शिबिराला पुण्याचे माजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (Ex. Deputy RTO) श्री. संजय साहेब सासाने यांनी विशेष भेट दिली.
या प्रसंगी श्री. सासाने सरांनी प्रशिक्षणार्थी महिलांशी संवाद साधून त्यांना रस्ता सुरक्षितता आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले, तसेच त्यांच्या या धाडसी पाऊलाचे कौतुक केले. या वेळी आयडीटीआर पुणे येथील मुख्य प्रशिक्षण फॅकल्टी (Training Faculty) श्री. बाजीराव गायकवाड सर उपस्थित होते. त्यांनी मान्यवरांचे स्वागत केले व प्रशिक्षणाच्या प्रगतीबद्दल माहिती दिली.



















