चंद्रपुर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, विकास खोब्रागडे
दि.२७/१/१९
चिमूर – चिमूर येथिल जेष्ठ पत्रकार रामदासजी हेमके यांच्या पत्नी सौ.रजनी रामदास हेमके वय ४५ याचे शनिवारी रात्री दिर्घ आजाराने नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दुखद निधन झाले त्या गेल्या काही वर्षा पासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या त्यांचेवर आज दिनांक २७ जानेवारी ला दुपारी १ वाजता मोक्षाध्यमावर अंतीमसंस्कार करण्यात आले. रजनी हेमके यांची प्रकृती गेल्या दोन वर्षांपासून बरी नसून त्या किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या त्यांच्या दोन्ही कीडण्या निकामी झाल्याने त्याचेवर दर माहिण्याला डायलेसीस करण्यात येत होते त्यांना नागपूरच्या शासकीय रुग्णालया मध्ये भरती करण्यात आले असता उपचारादरम्यान शनिवारी रात्री किडनीच्या दिर्घ आजाराने नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दुखद निधन झाले.
आज दिनांक २७ जानेवारी ला दुपारी १ वाजता चिमूर च्या मोक्षाध्यमावर अंतीमसंस्कार करण्यात आले .यावेळी चिमूर विधानसभा आमदार मा, किर्तीकुमार भांगडीया यांचे अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. यावेळी सर्व पक्षाचे पादाधिकरी,राजकिय नेते ,पत्रकार आणी आप्तेष्ट , नागरिकांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली .



















