सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२८/०१/२०१९
पाटण, सातारा जिल्हा युवा विध्यार्थी/विध्यार्थींनी सामजिक संघटना,पाटण या संघटनेने काढलेल्या निषेध मोर्चाला अनेक सामजिक व राजकीय विध्यार्थी संघटनांनी पाठींबा जाहीर केला असून राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा.संदीप लोहार यांनी हा मोर्चा यशस्वी करण्यात नियोजनापासून ते समरोप होईपर्यंत विशेष प्रयत्न केले तसेच किसान मंच शेतकरी संघटना सातारा जिल्हा व मराठा क्रांती मोर्चाचा पाठींबा असल्याचे मा.शिवाजी कोळेकर यांनी जाहीर केले त्या प्रसंगी अनेकांनी आपापली मते व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे विक्रम देसाई, निर्भिड पत्रकार तालुका प्रतिनिधी अनिल माने यांनी आपले मनोगत व्यक्त केल्या नंतर बाळासाहेब देसाई कॉलेजच्या विद्यार्थींनी आपले मनोगत व्यक्त केल्या नंतर कुमारी म्हस्के हिने आपले मनोगत व्यक्त करताना भारतात होणाऱ्या स्त्रीभृण हत्या महिलांनवरील अन्याय अत्याचार व महिलांच्या हत्या याबाबत बोलताना भारतीय संस्कृतीच्या मोठेपनातील पोकळ वास्तवतेची जाणीव करून देत प्रशासकीय अधिकारी पोलीस प्रशासन न्याय व्यवस्था अशा प्रकारच्या जबाबदार अधिकाऱ्यांनीच आपल्या अधिकाराच्या बळावर अशा प्रकारचे होणारे अन्याय अत्याचार रोखावेत व आम्हा मुलींचे अर्थात सर्व स्त्री जातीचे रक्षण करावे तुमच्याशीवाय हे काम कोण करूच शकणार नाही अशी कळकळीची विनंती दिवंगत भाग्यश्री माने हिला श्रध्दाजली पर दोन शब्द बोलताना मनोगत व्यक्त केले.यानंतर सातारा जिल्हा युवा विध्यार्थी/विध्यार्थींनी सामजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.शुभमजी उबाळे यांनी आरोपींना इतर कोणतीच शिक्षा न देता संबधीत आरोपींना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी असे दिवंगत भाग्यश्री माने हिला श्रध्दांजली वाहताना आपले मनोगत व्यक्त केले.तसेच हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील जाणकारांनी सामजिक संघटनांनी राजकीय विध्यार्थी संघटनांनी जो काही पाठींबा दर्शवला जे काही सहकार्य केले तसेच सर्व शाळांचे प्राचार्य संबंधीत शैक्षणिक संस्था ज्यांनी ज्यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन सहकार्य केले त्या सर्वांचेच संघटनेच्या वतीने मी आभार मानतो आणी भविष्यात सुद्धा कोणत्याही संकटकाळी सामजिक अन्यायाविरुध्द लढन्यासाठी असेच आपणाकडून मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील करपेवाडीच्या हद्दीत एका उसाच्या शेतात १७ वर्षीय महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थीनीचा धार-दार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली असून या घटनेचा निषेध सर्व पाटण तालुक्यातील सामजिक विध्यार्थी संघटनांनी केला.त्याबाबतच्या देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की सदर घटनेच्या तपासामध्ये पोलीस प्रशासनाने दाखवलेली तातडीची कर्तव्य दक्षता विचारात घेतल्यास त्यांच्याकडून खूपच प्रामाणिक आणी प्रगतसील तपास होत असल्याचे जाणवते त्याबाबत सदर संघटनांच्या वतीने पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करून संबधीत आरोपींना लवकरात लवकर पकडून फाशीचीच शिक्षा देण्यात यावी असे निवेदनात म्हंटले आहेे.सदरचे निवेदन प्रशासनाच्या वतीने पाटण तहसीलदार मा.रामहरी भोसले यांनी स्वीकारले.



















