पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०३.०३.१९
येथील संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित वधुवर परिचय मेळाव्यास युवक युवतींचा भरघोस प्रतिसाद मिळाला.या मेळाव्याचे आयोजन सम्यक वधुवर सूचक केंद्रातर्फे करण्यात आले होते.यावेळी प्रत्येक क्षेत्रातील युवक व युवतींनी लक्षणीय सहभाग नोंदविला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक किरण शिंदे,ऍड.संदीप डोंगरे,अरविंद सोनोने,संचालिका संध्या डोंगरे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.सूत्र संचालन ऍड. संदीप डोंगरे यांनी केले.किरण शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.असे परिचय मेळावे वेळोवेळी आयोजित करण्याची गरज यावेळी त्यांनी विषद केली.



















