सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिल माने
दि.०३.०८.१९
◆ मारुती आनंदा जाधव यांना मदतीची गरज
पाटण- तालुक्यातील मल्हारपेठ गणातील मौजे त्रिपुडी गावी कायमचे रहिवाशी ग्रामस्त श्री.मारुती आनंदा जाधव हे मोलमजुरी करून आपली दोन मुले पत्नी आणी स्वतः कसेबसे जीवन जगत होते पण काळापुढें कोणाचेही काही चालत नाही याचा अनुभव मारुती जाधव यांना रविवार दिनांक २८/०७/२०१९ रोजी आला रविवारी मुसळधार पावसाच्या माऱ्यामुळे त्यांच्या राहत्या घराची पश्चिमेकडील भिंत पहाटे ३ वाजता अचानक कोसळल्याने दचकून पुर्ण कुटूंब अचानक जागे झाले काही कळायच्या आतच लक्षात आले भिंत पडल्याची पाहून चिंतेचा डोंगरच त्यांच्यावर कोसळला भिंत पडल्याचा आवाज शेजारील घरांना जाणवल्याने आसपासच्या लोकांनी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेवून माजी सरपंच आबा देसाई, माजी उपसरपंच राहुल देसाई व पोलीस पाटील वर्षा देसाई हे जाधव कुटुंबाच्या मदतीस धावले व तलाठी गायकवाड यांना बोलावून सदर घराच्या पडझडीचा तत्काळ पंचनामा केला.
या घटनेला दोन दिवस होतात न होतात तोच दक्षिणेकडील त्याच घराची दुसरी भिंत कोसळल्याने मारुती जाधव हे आणी त्यांचे कुटूंब पूर्णपणे हतबल झाले असून वाऱ्यापावसाच्या माऱ्यात पडत्या भिंतीच्या घरात आपली दोन मुल पत्नी आणी स्वतः अक्षरशः मृत्युच्या छायेत वास्तव्य केल्या सारखे दिवस रात्र काढत असून या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची असल्याने सदर कुटुंबास तातडीच्या मदतीची अत्यंत आवश्यकता आहे.तसेच शासकीय यंत्रणेकडून सुद्धा या पडलेल्या भिंतीचा पंचनामा व्हावा अशी सदर शेतकऱ्याची अपेक्षा असून या शेतकऱ्याला मदत करत्या दान शूर व्यक्तींनी आणी दान शूर संस्थांनी मदतीचा हाथ पुढे करणे अत्यंत गरजेचे आहे.



















