बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०३.०८.१९
बीड- जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षापासूनचे शेतकऱ्यांचे विविध कंपन्यांने पीक विम्याचे पैसे अडकून धरले आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे अशा शेतकऱ्यांची थकित कर्जाच्या नावाखाली त्यांच्या खात्यांना होल्ड लावल्यामुळे त्यांना आलेल्या विम्याच्या पैशापासून बँका कडून मुद्दाम दूर ठेवले जात आहे ते होल्ड उठवणे.सातबारा वरील बोजा कमी करणे, प्रधानमंत्री सन्मान योजना जलद गतीने राबविणे,आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील तलाठी यांनी दुष्काळीखरीप अनुदान दहालाख रूपये चेक अद्याप बँकेत वर्ग केलेला नाही.याची चौकशी होवून शेतकऱ्यांचे खरीप अनुदान देणे बाबत व जिल्ह्यात सततच्या दुष्काळामुळे शेतकरी वैतागलेले असतानाही पिक विमा कंपन्यांचे अधिकारी शेतकऱ्यांना विविध कारणे सांगून दिशाभूल करत आहेत यामध्ये युनायटेड इंडिया, ओरिएंटल इन्शुरन्स,एचडीएफसी,बजाज एलियन्स आदी कंपन्याकडे शेतकऱ्यांचे विम्यापोटीचे कोट्यावधी रुपये नाहक पडून आहेत ते कंपन्यांनी शेतकऱ्यांना अदा केलेले नाहीत.
पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचा विमाहप्ता पूर्ण मिळालेला असूनही ओव्हर इन्शुरन्स च्या नावाखाली शेतकर्यांची व सरकारची घोर फसवणूक या कंपन्या करत आहेत.
पीक कर्जाच्या संदर्भात मध्ये जिल्ह्यातील अग्रणी बँक व बँका पीक कर्जाची दिलेले उद्दिष्ट ही पूर्ण करत नाहीत. बँक अधिकाऱ्यांची वाढती मुजोरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पीक कर्जासाठी अनावश्यक कागदपत्रे मागणी दलालांच्या मार्फत पीक कर्ज वाटपासाठी प्रत्येक बँकांनी दलाल नेमले आहेत त्यांच्या मार्फतच पीक कर्जाचे वाटप चालले आहे याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी आपल्या विमा भरती वेळी काही तांत्रिक चुका झाल्या त्यामुळे हजारो शेतकरी विम्यापासून आज वंचित आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व त्यांना भरलेल्या विम्याच्या पैशासाठी त्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांच्याशी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांची जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी बैठक सोमवार (दि.०५.०८.१९) रोजी दुपारी ४:००वाजता बैठकीचे आयोजन केले आहे यासाठी पीक विम्याचे अधिकारी अग्रणी बँकेचे व सर्व बँकांचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी समक्ष उपस्थित राहून तोडगा काढणार आहेत. तरी जिल्हाभरातील सर्व शेतकऱ्यांनी ज्यांना काही त्रुटींमुळे अद्यापि विमा मिळाला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कागदपत्रासह आणि भरलेल्या विम्याच्या पावती सह उपस्थित राहण्याचे आवाहन कालीदास आपेट कार्याध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, शेख अजिमोद्दिन जिल्हाध्यक्ष बीड, रामेश्वर गाडे युवा शेतकरी संघटना अध्यक्ष बीड, अशोक हाटवटे गेवराई युवा तालुका अध्यक्ष, रामप्रसाद गाडे तालुका अध्यक्ष गेवराई, सय्यद रहेमान, रघुनाथ नावडे मामा, बाबु शिंदे, नंदू शिंदे, शाबानखान पठाण, भिमा झगडे रिजवान बेग आदि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.



















