चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,योगेश्वर पि. शेंडे
दि.२३.११.१९
नागभिड- दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या पूर्व विदर्भ भागात प्रवासी वाहतूक व्यवस्था नागभीड नागपूर रेल्वे हि २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नागभीड रेल्वे प्रशासनाने शेवटची न्यारो गेज रेल्वे सेवा कायमची बंद करण्यात येणार आहे. यामुळे नागभीड प्रवासी वाहतूक व रेल्वेच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. इंग्रज सरकारने सुरू केलेल्या न्यारो गेज रेल्वे ने २०१९ पर्यंत सुखी व चांगली सेवा केली त्यामुळे गोरगरिब जनतेची सेवा कमी पैशात नागपूरला जाणारी वाट उद्या पासून बंद करण्यात येणार असल्याने नागभीड- नागपूर रेल्वे स्थानक या गाडीच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे या नंतर मोठी रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू केले जाणार आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने गेल्या वर्षी हा प्रश्न निकाली काढून नागपूर मेट्रोच्या बाबतीत मात्र महत्व देणारा आहे. त्यामुळे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच रेल्वे वाहतुकीचे स्वप्न साकार करण्यासाठी ७० वर्षे वाट पाहात राहावी लागली याआधी कांग्रेस सरकारने गाजावाजा केला पण पूर्तता केली नाही मात्र भाजपा सरकारने दिलेले आश्वासनाची पूर्तता उशिरा का होईना पूर्ण केली आहे उद्या होणाऱ्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता रेल्वे प्रशासन आणि राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे असे रेल्वे स्टेशन कडून सांगण्यात येत आहे.



















