चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२७.११.१९
चिमूर – पिपर्डा( प)येथील भारतीय बौद्ध समाज मिलिंद फेडरेशनच्या वतीने संविधान सन्मान दिन निमित्त दि.२६/११/२०१९ ला सायंकाळी ६ वाजता बुद्ध विहिरीच्या पटगांवर सर्व महामानवानं अभिवादन करून धम्म ध्वज ध्वजारोहण करून बुद्ध वंदना घेवून कार्यक्रमला सुरवात करण्यात आली. भारतीय संविधानाची शपथ घेण्यात आली
मा.रुपचंद बरसागडे माजी सरपंच यांचा अध्यक्षते मधे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला ७० वर्षे ११ महिने २९ दिवस होत असून.
२६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करून लोकशाही बळकट करू या असे प्रबोधन मा.चूणारकरसर यांनी केले आहे.
घटना परिषदेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली. त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट कराव असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी कारन्यात आले या वेळी कार्यक्रमास जगदीश सूर्यवंशी, सातपुते साहेब, पांडुरंग कळाम, हरिहर चुनारकर सायंकाळी ७ वाजता स्नेहभोजन चा कार्यक्रम करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे संचालन अतुल रमेश मेश्राम,आभार मनोज उद्धव खोब्रागडे यांनी मानले या कार्यक्रमास निलकांठ मेश्राम, कुणाल रामटेके, प्रितम तांगडे, समीर मेश्राम, शुभम चुनरकर, पाटवाळी मेश्राम,समीर मेश्राम, हिमा रामटेके, तेजस गोंडाने, कु,रामटके व यांनी सदर कार्यक्रम मोठया हिरिरीने भाग घेतला व कार्यक्रम घडवून आणला या कार्यक्रमास उपासक उपसकांची मोठ्या संख्यनी उपस्थिती होती.



















