उस्मानाबाद(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,वसिम सय्यद
दि.२७.११.१९
कळंब- शि. म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना भारतीय संविधानाचे महत्त्व आणि भारतीय संविधान जनजागृतीसाठी आजच्या युवा पिढीची जबाबदारी महत्त्वाची आहे असा विद्यार्थ्यांना संदेश दिला. यावेळी संविधानावर भाष्य करताना डॉ.नामानंद साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संविधानाची शपथ डॉ.मीनाक्षी जाधव यांनी दिली.तसेच २६/११ च्या मुबंई हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेल्या शूरवीरांना प्रा.के.डब्ल्यू पावडे व प्रा. सरस्वती वायभासे यांनी विद्यार्थ्यांच्या समवेत सभाग्रहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.ईश्वर राठोड यांनी केले. तर आभार प्रा.संदीप महाजन यांनी केले. यावेळी व्यासपीठावर डॉ.कमलाकर जाधव, प्रा.सूर्यवंशी, प्रा.बाबर व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.



















