नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, महेश दारुंटे
दि.२९.११.१९
येवला- केंद्रीय सांख्यकी कार्यालयामार्फत संपूर्ण देशात सातवी आर्थिक जनगणना करण्यात येत असून नाशिक जिह्यात आगामी तीन महिन्याच्या कालावधीत हि जनगणना करण्यात येणार आहे. या गणनेच्या माध्यमातून सर्व नागरिकांची माहिती संकलित करण्यात येणार असल्याचे जिल्हा सांख्यकीअधिकारी प्रकाश पोळ यांनी कळविले आहे.
तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबात जाऊन गणना कार्य्ण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटर या संस्थेचे नियुक्त आणि ओळखपत्रधारक प्रतिनिधी घरोघरी जाऊन आर्थिक जनगणना शासकीय असल्याचे सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबाची आणि सर्व आर्थिक उपक्रमांची , व्यवसायाची माहिती संबंधित प्रगणकास देऊन सहकार्य करावे, तसेच येवला शहराचीगणना करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर श्री. शिवकुमार आनंद व श्री. प्रशांत गायकवाड याना मिळाले आहे.तर ग्रामीण भागासाठी भारत भड याना मिळाला आहे. यामध्ये संपूर्ण तालुक्यात शंभर प्रगणक काम करणार आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणहि दिलेले आहे.
नाशिक जिल्ह्याचे कालेक्टर श्री. सुरेश मांढरे व कॉमन सर्व्हिस सेंटरचे महेश केलते, विजय शेलार, विक्रांत बोरसे आणि जिल्हा सांख्यकी विभाग व इतर अधिकार्यांच्या समवेत आर्थिक जनगणना सुरु झाल्याचे जाहीर केलेलं आहे. तालुक्यातील सर्व कॉमन सर्व्हिस सेंटर चालकांनी शहरातील सर्व शासकीय अधिकारी व पदाधिकारी याना सूचित केले आहे.
कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास संपर्क साधावा श्री. शिवकुमार आनंद ९०४९७६४७३०, श्री.प्रशांत गायकवाड ७७४४०६७५८८, महेश दारुंटे ७०८३६५५९६०, भरत भड ७२७६३६३३०५ या येवला शहर सुपरवायझर यांच्या सोबत मोबाईलवर संपर्क साधावा.



















