उस्मानाबाद (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१०.१२.१९
प्रधानमंत्री किसान योजनेमधील शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाची सद्यस्थिती जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याशी त्वरित संपर्क साधून आपली माहिती अद्ययावत करुन घ्यावी असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी सांगितले.उस्मानाबाद जिल्हयात आजपर्यंत प्रधानमंत्री किसान योजनेत एकूण लाभार्थीं २ लाख ३४ हजार ३७१ पैकी प्रधानमंत्री किसान पोर्टलवर २ लाख २९ हजार ०५५ इतक्या लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्यात आली असून शिल्लक लाभार्थीची संख्या ५ हजार ३१६ इतकी आहे.
पहिल्या हप्त्यामधील लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या १ लाख ८६ हजार ३७७, दुसऱ्या हप्त्यामधील लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या १ लाख ६८ हजार १२३, तिसऱ्या हप्त्यामधील लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या ६४ हजार ६३० असून आधार कार्डाशी निगडीत माहिती अभावी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या ९४ हजार ७२४ आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेमधील नोंदणी केलेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर (CSC) जाऊन किंवा स्वत: जाणून घेण्यासाठी http://www.pmklsan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन Farmers Corner या ऑप्शन मधील Beneficiary Status वर क्लिक करून त्यांचा आधार क्रमांक, बँक खाते नंबर, मोबाईल नंबर टाकून शेतकरी लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती पाहता येईल.
प्रधानमंत्री किसान योजनेमधील नोंदणी केलेले नाव आधार कार्डवरील नावाप्रमाणेच असणे आवश्यक आहे. अन्यथा यापुढील प्रधानमंत्री किसान योजनेमधील हप्ते मिळणार नाहीत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
नोंदणी केलेल्या नावात दुरुस्ती करण्यासाठी आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्रावर (CSC) जाऊन फक्त १०/- रुपये शुल्क भरुन किंवा स्वतः जाणून घेण्यासाठी http://www.pmklsan.gov.in वर जाऊन Farmers Corner या ऑप्शन मधील Edit Aadhar Failure Records यावर क्लिक करुन आपला आधार नंबर टाकून नावाची दुरुस्ती करून घ्यावी. आपल्या अर्जाची स्थिती पाहिल्यानंतर Either Details are no registered in the portalअसे आढळून आल्यास आपण जवळच्या आपले सरकार केंद्रावर जाऊन फक्त १५/- रुपये शुल्क भरून आपल्या नावाची नोंदणी करावी किंवा http://www.pmklsan.gov.in या संकेतस्थळावरून Farmers Corner या ऑप्शन मधील New Farmer Registration यावर जाऊन नावाची नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी आपल्या गावासाठी नेमून देण्यात आलेल्या तलाठी/ ग्रामसेवक/ कृषी सहाय्यक किंवा आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्राशी त्वरित संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी प्रधानमंत्री किसान
योजना श्री. राजेंद्र खंदारे यांनी आवाहन केले आहे.



















