थेरगाव- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिरचे वाय सी एम हाॅस्पिटल मधील रक्तपेढीच्या माध्यमातून थेरगांव येथील शनीमंदिराजवळ संपन्न झाले. या वेळेस शिवसैनिक व मातोश्री सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर, प्रहार संघटनेचे संजय गायखे यांनी केले. या शिबिरात ६० पिशव्या रक्तदान झाले.
या कार्यक्रमाला पिंपरीगावातील नगरसेवक संदिप वाघेरे यांनी देखील रक्तदान केले व कार्यक्रमाचे कौतूक केले.
या वेळी गुलाब गरूड, संदिप कापसे, नितीन घोलप, डाॅ.योगेश कूलथे, सूदर्शन देसले, निखील येवले, सौ.स्वरूपा खापेकर जिल्हा संघटिका, सौ.अनिता तूतारे चिंचवड विधानसभा संघटिका, सौ.शिल्पा आनपण रहाटणी विभाग संघटिका, सौ.वैशाली कूलथे पिंपरी विधानसभा, सौ.भाग्यश्री म्हस्के काळेवाडी विभाग संघटिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक गोरख पाटील, बाळासाहेब गायकवाड, मारूती म्हस्के, रविकिरण घटकार, गणेश पाडूळे, माऊली जाधव, अधिक भोसले, नरसिंग माने, अक्षय घटकार, दिपक भक्त, दत्ता गिरी यांनी केले.



















