मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०३.२०२०
अंबरनाथ- जागतिक महिला दिवस असताना एक महिला उपोषणाला बसली असून आज सहावा दिवस असून कोणताही प्रशासन अधिकारी दखल घेण्यासाठी येत नाही. एक महिला आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत असेल आणि कोणीही तिची दखल घेत नसेल तर अशा वेळी हा दिवस का म्हणून साजरा करायचा ? असा प्रश्न जनता विचारत आहे .
अंबरनाथ नगरपालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बेघर करण्यात आलेल्या ७२ कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी बेघर झालेल्या नागरिकांनी गेल्या सहा दिवसा पासून गावंदेवी रोड येथे आमरण उपोषण सुरू आहे .अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने कल्याण बदलापुर राज्यमार्गावरील विमको नाका ते गावंदेवी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून सदरचा रस्ता विकास आराखड्यात १२ मीटर मंजूर असताना पालिकेने काही राजकीय नेते .व पुढाऱ्यां च्या इशाऱ्यावर स्थानिक बिल्डरांना फायदा पोहचवण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण २२ मीटर करून या रस्त्याच्या बाजूला राहणारे जवळपास ७२ कुटुंबाच्या घरावर बुलडोजर फिरवून त्यांना बेघर करण्यात आले ज्यांची घरे उध्वस्त करण्यात आली ते या ठिकाणी गेली ४० वर्षा पासून राहत होते. विशेष म्हणजे या सर्व रहिवासीयांना कोणती नोटीस न देता नगरपालिकेने त्यांची घरे उध्वस्त केल्याचा आरोप आमरण उपोषणाला बसलेल्या मीना आचार्य यांनी केला आहे .
मीना आचार्य हि एक अंगणवाडी शिक्षीका असून अविवाहित आहे. ती व तिचा भाऊ दोघे जण गेली ४०/४५ वर्षापासून उपोषण करत असलेल्या ठिकाणी राहतात. सध्या ते बेघर असून उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना प्रशासन अर्थात मुख्याधिकारी हे आपल्या काही अधिकाऱ्यांना घेऊन बिल्डर्स लॉबीसी संगनमत करून गरीब महिलेला जाणून बुजून त्रास देत आहेत असा आरोप मीना आचार्य यांनी केला. याबाबत त्यांच्यावर महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी सर्व रहिवासी महिला करत आहेत.



















