मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०३.२०२०
अंबरनाथ- पुर्व येथील शिवसेना नगरसेवक, शाखा प्रमुख यानी आपल्या काही कार्यकर्त्यासह माजी मंत्री व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे . त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जोरदार झटका बसला आहे .
अंबरनाथ नगरपालिकेची निवडणुक लवकरच जाहीर होणार आहे. तेव्हा अंबरनाथ पुर्व भाजपाचे शहर अध्यक्ष अभिजित करंजुले यानी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच मोर्चे बांधणी सुरु केली आहे. दरम्यान भाजपाच्या पदाधिकारी नियुक्तींच्या कार्यक्रमात शिवसेना नगरसेवक रोहित महाडीक, शाखा प्रमुख महेश मोरे, विभाग प्रमुख नितीन परब, गट प्रमुख विक्रम पांचाळ, प्रविण माने यानी आपल्या कार्यकर्त्यासह शिवसेनेला जय महाराष्ट्र करत माजी मंत्री व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान या कार्यक्रमात गुलाब करंजुले, किसन तारमळे, पुर्णिमा कबरे, शशिकांत कांबळे हे उपस्थित होते. हा कार्यक्रम अंबरनाथ पुर्वचे शहर अध्यक्ष अभिजित करंजुले व अंबरनाथ पश्चिमचे शहर अध्यक्ष राजेश कोठाळे यानी स्वानंद सभागृहात आयोजित केला होता. दरम्यान या वेळी रविंद्र चव्हाण म्हणाले की अंबरनाथ नगरपालिकेवर भाजपा ३० सीट वर कब्जा करुन सत्ता स्थापन करणार आहे त्यानी शिवसेनेवर आरोप करत सेनेने २५ शहराचा कोणता ही विकास केला नसल्याचे म्हटले आहे.



















