नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०३.२०२०
येवला- तालुक्यातील राजकीय तसेच आर्थिक दृष्टया महत्व असलेल्या पाटोदा येथील आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे बांधकाम शासकीय निधीतून सुरू असून पायातच अत्यन्त निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरत असल्याचे गावातील प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊ नाईकवाडे, शाखा अध्यक्ष गोरख निर्मळ, उपाध्यक्ष सुनील पाचपुते यांच्या लक्षात येताच त्यांनी इतर कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या मदतीने बांधकाम स्थळी जाऊन पहाणी करत सुपरवायझर, ठेकेदार यांना सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असून कामाच्या प्लॅन, इस्टीमेट बाबत विचारणा केली असता सदर ठेकेदाराने गोलमाल उत्तर दिल्याने रामभाऊ नाईकवाडे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती यांचेशीही भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत निकृष्ठ कामाबाबत माहिती देत सदर ठेकेदार ठराविक मापदंडा नुसार काम करत नसून काम बंद करण्याच्या सूचना दिल्या. सदर अधिकाऱ्यांनी उद्या पहाणी करण्यास येतो असे सांगितले. वास्तविक शासन विकास कामांसाठी जनसामान्यांच्या करातून आलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम खर्च करते पण संगनमताने सर्वस्थरीय चाळणीतून मोजकीच रक्कम शेवटच्या घटकापर्यंत पोचत असताना तिथेही अशा प्रकारे जर हाथ मारल्या जात असेल तर असे प्रकार प्रहार या पुढे खपवून घेणार नाही असे यावेळी बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊ नाईकवाडे, तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी सांगितले.



















