सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०३.२०२०
• पन्हाळ्यातील बालग्राम आश्रमात खाऊ व अन्नधान्य वाटप
पाटण- सामाजिक कार्यकर्ते रोहित व्हावळ यांच्या वाढदिवसानिमित्त भोसले प्रतिष्ठान करवीरच्या वतीने पन्हाळा येथील बालग्राम आश्रमातील मुलांना खाऊ वाटप करून व आश्रमात अन्नधान्य वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास भोसले प्रतिष्ठान करवीरचे संस्थापक, अध्यक्ष कृष्णा भोसले, शुभम सुतार, उदय खंबे, ऋषी भोसले उपस्थित होते.



















