पिंपरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, विकास आेव्हाळ
दि.१३.०३.२०२०
पिंपरी – पेरणे फाटा येथे सोडण्यास घेऊन जातो. असे सांगून टेम्पो चालकाने एका महिलेला पिंपरी चिंचवडला आणून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आळंदी ते पिंपरी चिंचवड परिसरात १० मार्चला रात्री आकरा ते ११ मार्च रोजी पहाटे चारच्या दरम्यान घडली आहे.
याप्रकरणी एका २९ वर्षांच्या महिलेने आळंदी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयशर टेम्पोचालक व क्लिनर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, आळंदी येथील या महिलेला टेम्पोचालकाने पेरणे फाटा येथे घेऊन जातो, असे सांगून गाडीत बसवून घेतले.त्यानंतर त्याने टेम्पो पेरणे फाटा येथे न जाता तो पिंपरी चिंचवडच्या दिशेने घेतला. त्यानंतर टेम्पोमध्येच तिच्यावर चालक व क्लिनर यांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी या महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली व कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवड सोडून देऊन ते पसार झाले या घटनेनंतर ही महिला परत आळंदी येथे आली. तिने पोलिसांकडे धाव घेतली बुधवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक लोहेकर अधिक तपास करीत आहेत.



















