सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.३.२०२०
फलटण- कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हाअधिकारी यांनी पेट्रोल पंपाना नियम घालून इंधन विक्रीच आदेश दिले आहेत, ते आदेश डावलून काही पेट्रोलपंप चालक नियमित विक्री करत असल्याने पेट्रोल पंपावरती हाजारो लोक एकत्र होतानाची गर्दी पहायला मिळत आहे.
या बाबत काही पत्रकांराने विचारना केली असता त्यांना शिवीगाळ करत धमकविल्याच्या तक्रार देखिल पंप चालका विरोधात दाखल करण्यात आली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देवून अशा मनमानी कारभार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरीकांमधून केली जात आहे.



















