नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, शांताराम दुनबळे
दि.२९.०३.२०२०
नाशिक- जगभरासह महाराष्ट्रात करोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रात करोनाचा एकही रूग्ण शनिवारपर्यंत आढळून आला नव्हता मात्र जळगावपाठोपाठ रविवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ३० वर्षीय तरूणाचा अहवाल पॉझीटीव्ह आला असल्याचे समोर आले आहे.
नाशिक जिल्हयातील निफाड तालुक्यातील लासलगांव जवळच्या नंदनवन नगर पिंपळगांव नजिक येथील ३० वर्षाचा रहीवासी युवक हा रजा नगर येथील दुकानांत काम करीत होता. त्याला दि. १२ मार्चला खोकला व ताप अशी लक्षणे असल्यामुळे तेथील खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी गेला होता मात्र बरे न वाटत नसल्याने २५ रोजी ग्रामीण रुग्णालय लासलगांव येथे उपचारासाठी गेला. त्यांना न्युमोनियाची सदृश लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालय नाशिक येथे उपचार घेण्यासाठी जाण्यास सांगितले. वाहनाने दि. २७ जिल्हा रुग्णालय नाशिक येथे उपचारासाठी दाखल झाला. त्याला जिल्हा रुग्णालय नाशिक येथील वैद्यकिय पथकाने विलगीकरण कक्षांत दाखल केले.
घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असुन तो करोना विषाणु बाधित असल्याचा निष्कर्ष आलेला आहे . सदर रुग्णाची तब्येत स्थिर असुन त्याला कोरोना आजारासंबंधी येथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडुन उपचार करण्यात येत आहे. उर्वरित कोरोना विलगीकरण कक्षातील दाखल रुग्णांचे घश्याच्या नावाचे स्वॉब निगेटीव्ह आहेत . सध्या कोरोना विलगीकरण कक्षांत ७ रुग्ण दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असुन ती सुधारत आहे . व त्यांना उद्या डिस्चार्ज करण्यांत येणार आहे .
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संनियंत्रणानुसार करोना विषाणु पॉझीटीव्ह रुग्णाच्या घराच्या परिसरातील घरातील व्यक्तींचे साथरोग सर्व्हेक्षण पथकामार्फत सुरु करण्यांत आले आहे. नागरिकांनी घाबरुन जावु नये, आपण घराबाहेर पडु नका हात वरचेवर सावणाचे पाण्याने स्वच्छ धुवा, आपला हात आपले नाक, तोंड , डोळे यांना लावण्याचे टाळा. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



















