सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, चंद्रकांत सुतार
दि.२९.०३.२०२०
पाटण- पोलिस प्रशासनाकडून कोरोना वायरस संबंधिच्या संचार बंदीच्या बाबत घेण्यात येणाऱ्या दक्षतेबाबतचा विचार करता सहाय्यक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या सह अनेक पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना त्यांना वेळेवर जेवण्याचेही भान राहत नाही हे पोलिस कॉन्स्टेबल प्रताप मोहिते यांच्या कर्तव्यदक्षतेतून जनतेला जाणवले. पाटणमध्ये चौका चौकात नाकाबंदी करण्यात आली होती विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला. नाकाबंदी दरम्यान पाटणचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, पोलिस कर्मचारी पृथ्वीराज पाटील, ए.एम.गलांडे, आर.व्ही.पगडे, होमगार्ड सर्जेराव मोळावडे, सागर मोळावडे व इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.



















