(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी – जुबेर शेख
पुणे, १५ ऑगस्ट २०२४ – बावधन येथील एका रहिवाशाला ऑनलाईन शेअर्स फसवणुकीत ५४ लाख रुपयांनी गंडवले गेले आहे. ६ मे ते १३ जून २०२४ दरम्यान घडलेल्या या प्रकरणात, तिघा आरोपींविरुद्ध हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये आलिया त्रिवेदी, शिव साहू आणि गोखले यांचा समावेश आहे.
पीडित व्यक्तीने १४ ऑगस्ट २०२४ रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी प्रथम पीडिताचा विश्वास संपादन करून त्याच्या बँक खात्याची माहिती मिळवली. त्यानंतर, अधिक परताव्याचे आमिष दाखवून पीडिताला वेळोवेळी वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी फसवणूक केली. आरोपींनी एकूण ५४ लाख रुपयांची फसवणूक करून आर्थिक गुन्हा केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.