पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, संदीप जोगदंड
मुंढवा, , महात्मा फुले चौक मुंढवा येथे धम्मराज-ग्रुप च्या वतीने
‘EVM(मतदान यंत्र) हटवा, लोकशाही वाचवा.’ हा नारा देण्यात आला.यावेळी ही मशीन लोकशाहीला किती व कशी घातक आहे ते सांगण्यात आले व या मतदान यंत्राच्या प्रतिकृतीचे दहन देखील करण्यात आले. “भारतात होणारे मतदान हे पारदर्शी नसुन, लोकशाहीला यापासून सर्वात मोठा धोका आहे. अवघ्या दोन मिनिटात ही मशीन हॅक करता येते हे प्रसार माध्यमांतून देखील प्रसिद्ध झालंय, त्यामुळे याप्रकारे घेतल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवर सामान्य जनतेचा आता विश्वास राहिला नाही. पारदर्शीपणा आणण्यासाठी निवडणुका बॅलेट पेपर वर घ्याव्यात अशी आमची मागणी आहे.” असे मत धम्मराज ग्रुपच्या गौरव जाधव यांनी व्यक्त केले. “जर निवडणुका बॅलेट पेपर वर झाल्या नाहीत, तर ही यंत्रे फोडायला देखील आम्ही मागे हटणार नाही.”अशी भुमिका फुले-शाहु-आंबेडकर प्रतिष्ठानच्या संतोष सापळे यांनी मांडली. तसेच “या मतदान यंत्रामुळेच हे सरकार सत्तेत बसलेलं आहे.” असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीर कोद्रे यांनी व्यक्त केले. जर संविधान व लोकशाही वाचवायची असेल तर ही EVM (मतदान यंत्र) हटवावीच लागेल अशी भुमिका व सामाजिक कार्यकर्ते अँड. राजशेखर गायकवाड व मा.ग्रा.सदस्य रमेशदादा राऊत यांनी मांडली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निखिल गडकर तसेच आभार प्रदर्शन विकी माने यांनी केले.या कार्यक्रमाला भारिप बहुजन महासंघ, संभाजी ब्रिगेड,यशय सोशल सेवा फौंडेशन, फुले-शाहु-आंबेडकर प्रतिष्ठान घोरपडी,बामसेफ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष तसेच केशवनगर- मुस्लिम समाज व इतर पुरोगामी संघटनानी पाठिंबा दिला. या वेळी प्रकाश बोलभट, नूर खान,शफीक शेख, प्रकाश पारखे, विजय हटागळे,अजित वाघमारे,शुभम सोंडे,विशाल वंजारे,तुषार रासगे व अन्य पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन धम्मराज-ग्रुपच्या गौरव जाधव, धम्मपाल धुरंधर,आकाश कांबळे, भीमराज कदम, मंगेश वाकोडे,विकी माने, सिद्धार्थ कांबळे,सुरज दंदी, वृषभ वाकोडे तसेच कैलासजी कणसे,संभाजी ब्रिगेड कार्या. पुणे, या कार्यकर्त्यांनी केले.



















