पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि .१०.०८.२०२४
भीमा कोरेगाव- छ.संभाजी महाराज यांचे देहावर अंत्यविधी करणारे विर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या जयंती निमत्त वढू बु. येथील त्यांच्या समाधी स्थळी पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलन करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून त्यांच्या स्मृतीस मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे, गोविंद गोपाळ यांचे वंशज पांडुरंग गायकवाड, संदीप गायकवाड, विभागीय पोलिस अधिकारी ढोले, पोलिस निरिक्षक गायकवाड, सर्जेराव गायकवाड, निर्भीड पत्रकार वृत्तपत्राचे मुख्य संपादक नंदकुमार जोगदंड, दै. सम्राटचे पत्रकार रामदास लोखंडे, सुमित गायकवाड, विकास ओव्हाळ, केतन जगताप, बळीराम गायकवाड, विजय गायकवाड, स्वप्नील गायकवाड यांचेसह अनेक भीमसैनिक उपस्थित होते. धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.