मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०२.२०२०
मुंबई- अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमधे भारत आणि पाकिस्तानचा मुकाबला होणार आहे. प्रियम गर्गच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय टीमने ऑस्ट्रेलियाचा ७४ रनने पराभव करुन आधीच अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. आता पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ६ विकेटने पराभव केला, त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान सेमी फायनलमध्ये एकमेकांना भिडणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातली अंडर-१९ वर्ल्ड कप सेमी फायनल मंगळवार ४ फेब्रुवारीला पोचेफस्ट्रूममध्ये होणार आहे. तर दुसरी सेमी फायनल बांगलादेश आणि न्यूझीलंडमध्ये ६ फेब्रुवारीला होईल.