मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतीनिधी,
दि.२१.०७.२०१४
नवी मुंबई- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा वाढदिवस येत्या २७ जुलैला आहे. याचे औचित्य साधून पक्षाचे कार्यकर्ते हे प्रत्येक वर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम वेगवेगळ्या स्तरावर राबवून वाढदिवस उत्साहात साजरा करतात. याचेच औचित्य साधून रिपाइ (ए)नवी मुंबई मार्फत घणसोली येथील महापे हनुमान टेकडी या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेंद्रदादा गायकवाड यांच्या नेतृत्वात १०० वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला यावेळी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेंद्रदादा गायकवाड, उपाध्यक्ष मिलिंद राऊत, नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष योगेश गोरे, घणसोली तालुका अध्यक्ष संतोष बैले, घनसोली तालुका कार्याध्यक्ष मोहित गमरे, घणसोली तालुका उपाध्यक्ष ऍड. विठ्ठल गुमडे, विनोद इंगळे वार्ड अध्यक्ष महापे निलेश गोरे व गणेश वाघमारे इत्यादी उपस्थित होते



















