बीड(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१९.०४.२०२३
आष्टी- तालुक्यात असणाऱ्या सीना, कडी, बोकडी या नद्यांची पात्रे जेसीबी मशीनच्या साहाय्याने पोखरून वाळू माफियानी या नद्यांची अक्षरशः चाळण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या नदीपात्रात येणारी टाकळसिंग, चिखली, दैठण, पिंपळसुटी, वाकी, नागलवाडी या गावामध्ये वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. खुलेआम ट्रॅक्टर, जेसीबी मशीनच्या साहाय्याने नदीपात्र बेकायदा पोखरण्याचे काम चालू असून नागरिक मात्र प्रशासनाच्या डोळेझाक भूमिकेने आश्चर्यचकित झाले आहेत. या प्रकरणी निर्भीड पत्रकारने तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. प्रशासनाचे याप्रकरणी लक्ष घालून कठीण कारवाई करून पर्यावरणाचे रक्षण करण्याची गरज असल्याची भावना जनेतेतून व्यक्त होत आहे.