नवी मुंबई (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी मिलिंद राऊत.
दि.११.०३.२०२३
नवी मुंबई- यावर्षी होळी सणाचे सर्वच ठिकाणी मोठ्या दिमाखात, उत्साहात व पारंपरिक आयोजन आपणास बघण्यास मिळाले. याचाच एक भाग म्हणजे नवी मुंबईतील घनसोलीगाव येथील अगली-वेगळी पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारी होळी.
घणसोली गाव चिंच आळी येथे पारंपरिक होळी साजरी करताना दरवर्षीप्रमाणे “होळीचे सोंग” हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध वेशभूषा साकारत आनंदात टाळ-मृदुंग, डीजे व बँडच्या तालावर नाचत गावभर मिरवणूक घेण्यात आली. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नवीन जावाईबापुंचे स्वागत व सत्कार करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे होळीचे आयोजन शिव प्रसन्न मित्र मंडळ, महिला मंडळ तसेच श्री. मयूर मढवी ग्रुप यांच्यामार्फत करण्यात आले होते. येथील स्थानिक रहिवाश्यांनी आयोजकांचे कौतुक करून धन्यवाद दिले.