पिंपरी(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.०२.२०२३
पिंपरी- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना देवांग कोष्टी समाज संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. त्याबाबत संघटनेच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. चिंचवड मतदारसंघात वास्तव्याला असणारे देवांग कोष्टी समाजातील पाच हजार बांधव अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भरघोस मतांनी निवडून आणणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
देवांग कोष्टी समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश तावरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, “देवांग कोष्टी समाजाचे सुमारे पाच हजार मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहण्यास आहेत. समाजातील आम्ही सर्वजण सुरूवातीपासून आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक आहोत. आम्ही कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतो. जगताप कुटुंबाचेही आम्हाला कायम सहकार्य लाभले आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ सर्वांवर आली आहे.