ठाणे (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, मिलिंद राऊत.
दि.९.०४.२०२३
अंबरनाथ- बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचे अंबरनाथ पूर्व, ठाणे येथे ७ मे ते ९ मे २०२३ या काळात दिव्य दरबार आयोजित होत आहे. या दरबारात रोगांचे निदान आणि त्यावर चमत्कारिक उपचार धिरेंद्र शास्त्री यांचे कडून केले जातात.जे मजीक रेमीडीज अक्ट १९५४ चे उल्लंघन आहे. या चमत्कारिक उपचारांमुळे भोळ्याभाबड्या जनतेचे शोषण होत आहे. तसेच ते भूत पिशाच्चांना आवाहन करीत लोकांना भीती दाखवितात.चमत्कारांचे समर्थन करीत चमत्कारांचे नावावर अर्थप्राप्ती करतात. अंगात अतिंद्रीय शक्ती असल्याचा भास निर्माण करतात . हे महाराष्ट्र जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे.
या कायद्यांचे उल्लंघन होऊ नये यासाठी अंबरनाथ पोलीस स्टेशनला अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांचे नेतृत्वाखाली एक निवेदन देण्यात आले.
धिरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमांतून सातत्याने जादूटोणा विरोधी कायदा २०१३ व ड्रग अँड मॅजिक रेमिडिज ॲक्ट १९५४ यांचे उल्लंघन करण्यात येत आहे, ही बाब पोलिस अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली .निवेदनासोबत दोन्ही कायद्याच्या प्रती सादर करण्यात आल्या आहेत.
सदर कार्यक्रमात कोणत्याही प्रकारे जादूटोणा विरोधी कायदा 2013 व ड्रग अँड मॅजिक रेमिडिज ॲक्ट या कायदयांचे उल्लंघन होणार नाही याची ग्वाही निवेदन स्वीकारताना पोलिस निरीक्षक शिंदे यांनी दिली आहे.
शिष्टमंडळात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रकाश ढोकणे महिला संघटीका नीता डुबे,प्रसिद्धी प्रमुख शिवा कमलापुरे, सचिव दादाजी यशवंतराव कोषाध्यक्ष रवींद्र रहाटे , जिल्हा संघटक यशवंत सपकाळे,शैलेश सोनावणे,सानिकाशेट्ये,जगन्नाथ साबळे, युवा कार्यकर्ते सिध्दार्थ सपकाळे
सहभागी होते.