पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०८.२०२२
पुणे – डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे येथे सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वतंत्र दिनाचा ७५ वा वर्धापन दिनानिमित्त बार्टीचे महासंचालक श्री.धम्मज्योती गजभिये यांच्या हस्ते संस्थेच्या प्रांगणात तसेच शासकीय सफाई कामगारांच्या मुला मुलींची निवासी शाळा (बार्टी) येरवडा , पुणे येथे ध्वजारोहण करण्यात आले. सविधान प्रस्ताविकेचे वाचन डॉ.ज्योत्स्ना पडियार, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख बार्टी यांनी केले. भारतीय संविधानाचे निमार्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास व पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मा. महासंचालक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शासकीय सफाई कामगारांच्या मुला मुलींची निवासी शाळा बार्टी, येरवडा, पुणे येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स़ंचलन उत्कृष्टपणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून आपले मनोगत व्यक्त केले. महासंचालक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, सुरक्षारक्षक यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक, बार्टी, पुणे, डॉ.ज्योत्स्ना पडियार, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख बार्टी, श्री उमेश सोनवणे, उपायुक्त तथा विभाग प्रमुख बार्टी, श्रीमती संध्या नारखडे, श्री विकास गायकवाड, डॉ.प्रेम हनवंते, डॉ.सारिका थोरात, यांनी अमृत महोत्सवा निमित्त शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी, शिक्षक वर्ग, पालक, सुरक्षारक्षक, बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन श्रीमती ज्योत्स्ना लोढे यांनी केले आभार श्रीमती जयश्री चेनगे, मुख्याध्यापक यांनी मानले.