जामखेड प्रतिनिधी,
तालुक्यातील नान्नज येथील साळवे यांची भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या जामखेड तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांची निवड भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक उत्तरेश्वर कांबळे यांनी त्यांना नान्नज येथे निवडीचे पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण व राष्ट्रिय अध्यक्ष विनय रतन सिंग व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक कांबळे हे आहेत.या वेळी महाराष्ट्र संघटक कांबळे म्हणाले भीम आर्मी संघटना फुले, शाहू, आंबेडकर , छत्रपती शिवजी महाराज यांच्या विचारांची असून आम्ही प्रमाणिक पणे काम करत आहोत.आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणार, अन्याय अत्याचारला वाचा फोडण्याचे काम करणार,गोर गरीब जनते साठी शासनाच्या नविन योजना असतील त्या त्यांच्या पर्यंत पोहवचवनार आहोत.जामखेड तालुक्यात प्रत्येक गावी भीम आर्मी शाखा उदघाटन करणार असल्याचे ही ते म्हणाले,या वेळी नन्नज गावचे उपसरपंच तुळशीराम महोळकर, ग्रा.प.सदस्य अनिल भोसले यांनी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष शरद साळवे यांचा गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. साळवे यांच्या निवडी बद्दल नगरसेवक निखिल घायतडक, सागर आहेर, बाबुराव साठे, अविनाश गायकवाड़, विजय साठे, नितिन साळवे, दत्ता कांबळे, रमेश भवाळ, रितेश कदम यांनी अभिनंदन केले.