सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, पांडुरंग लोहार
पाटण, तालुक्यातील नाडोली सारख्या खेड्यात राहणारे नाडोली गावचे पहीले आंतरराष्ट्रीय कुस्तीपटटू महेश पवार यानां ऑलपिंकवीर आंतरराष्ट्रीय खेळाडू हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रिडा परिषद नवी दिल्ली यांच्या दिला जाणारा भारतीय क्रीडा क्षेत्रातील मानाचा मेजर ध्यानचंद राष्ट्रिय क्रीडा पुरस्कार २०१८जाहिर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा दि.२९ ऑगस्ट रोजी राष्ट्रिय क्रीडा दिना दिवशी वेणुताई चव्हाण सभागृह कराड येथे प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराने नाडोली गावासह पाटण तालुक्याची शान ऊंचावली असून महेश पावर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.