निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क, प्रतिनिधी,
दि.१३.०५.२०२३
शहापूर – शहापूर तालुक्यातील आपटे गाव येथील “ब्लू टायगर ग्रुप” च्या तरूणांचा बौद्ध पौर्णिमा या पवित्र दिवशी महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी मध्ये स्वयंस्फूर्तीने जाहीर प्रवेश केले.
महापुरुषांच्या संयुक्त जयंती सोहळ्यासाठी वंचित बहुजन आघाडी शहापूर तालुका प्रवक्ते तथा किन्हवली विभाग अध्यक्ष शंकर गायकवाड, तालुका उपाध्यक्ष विकास वाढविंदे, शेणवे विभाग अध्यक्ष प्रविण कांबळे, सावरोली शाखा उपाध्यक्ष जगदीश घायवट, विजय शिंदे तसेच ईतंर कार्यकर्ते प्रमुख उपस्थित होते. यावेळी ब्लू टायगर ग्रुपचे अध्यक्ष चंद्रकांत खंडागळे तसेच सहकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केले. वंचितची तालुक्यातील मागील काही वर्षांपासून चाललेली यशस्वी घोडदौड व कार्यकर्त्यांची काम करण्याची पद्धत पाहून आपटे येथील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने वंचित मध्ये काम करण्याची तयारी दाखवली.
महापुरुषांच्या संयुक्त जयंतीतोत्सव यशस्वी व आनंदात पार पडले. यासाठी ब्लू टायगर ग्रुप चे चंद्रकांतजी खंडागळे, दीपक खंडागळे, दीपक रणदिवे, शांताराम खंडागळे, जितेंद्र खंडागळे, नरेंद्र खंडागळे, अनंता खंडागळे, प्रकाश खंडागळे, आकाश खंडागळे,कपिल खंडागळे, अमोल खंडागळे, बाळा खंडागळे, विकास खंडागळे यांनी विशेष मेहनत घेतली.