विधानसभा निवडणुका पार पडून जवळजवळ महिना लोटला निकालानंतर पक्ष प्रमुखांचे जे सत्तास्थापनेसाठी बिगुल अवघ्या महाराष्ट्रात वाजत होते ते खरं तर फारच लांच्छनास्पद म्हणावे लागेल आणि खरंतर कुठेतरी मतदारांची चेष्टा तर करणारे नव्हते ना मतदारांनी आपला मतदानाचा हक्क पूर्णपणे बजावला असताना पक्षश्रेष्ठींकडून कुठेतरी त्याचा अवमान होत होता असे म्हणायलाही हरकत नाही.
एकूणच महाराष्ट्र मध्ये जय सत्तास्थापनेसाठी जे सत्ता नाट्य चाललं होतं ते मोठं विनोदी आणि गंभीर अशा स्वरूपाचं म्हणावं लागेल कारण भाजप बहुमत सिद्ध न करता एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटवून अवघा महाराष्ट्र साखर झोपेत असताना सत्ता स्थापन करू पाहत होतं आणि तेही कोणा सोबत की ज्यांनी पूर्वीपासून ज्यांना विरोध केला किंवा ज्यांनी विरोध केला त्यांच्यासोबत खरंतर इथे माझं कुठल्याही पक्षाला समर्थन नाही परंतु सत्तास्थापनेसाठी जे विडंबनात्मक सत्ता नाट्य चालू होतं ते कुठेतरी संविधानाची पायमल्ली तर होत नाही ना अशा स्वरूपाचं म्हणावे लागेल करण एका रात्रीत सरकार स्थापन होणार शपथविधी होणार. नंतर बरखास्त होणार हे चाललंय काय कुठेतरी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा सारखे हा प्रकार आहे. अवघ्या महाराष्ट्राच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. यावरून असं सिद्ध होतं की राजकारणा पाठीमागे षडयंत्र आहे की काय. असा भ्रम जनतेच्या मनात आहे आणि हा लोकशाहीचा अवमान आहे असंही म्हणता येईल मतदारांची मतदानाची किंमत आणि मतदारांचा विश्वास या राजकारण्यांकडून कुठेतरी दुरावला जात आहे ही खरे तर एक मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
कैलास गायकवाड पत्रकार येवला